News Flash

मुंबईत पाऊस सुरुच राहणार; जुलैमध्ये विक्रमी पाऊस पडण्याची शक्यता

येत्या २४ ते ४८ तासांत मुंबईत आणखी जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

गेल्या शनिवार व रविवारपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. येत्या काही दिवसांतही अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या २४ तासांत सकाळी साडेआठ वाजल्यापासून मुंबईच्या सांताक्रूझमध्ये ७० मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, उपनगराच्या ठाणे आणि इतर भागात २५५ मिमी नोंद करत पावसाने जोरदार हजेरी लावली. हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, येत्या २४ ते ४८ तासांत मुंबईत आणखी जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

१ जून ते १ जुलै या कालावधीत मुंबईत आतापर्यंत १८८१  मिमी पावसाची नोंद झाली आहे, जी आजच्या सरासरीपेक्षा ८५१ मिमीपेक्षा जास्त आहे. हवामानाचा अंदाज पाहता बऱ्याच प्रमाणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण आणि गोवा क्षेत्रासह पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनचा प्रवाभ पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

अशा परिस्थितीत उद्याही मुसळधार पाऊस कोसळणार आहे. तसेच आठवड्याच्या मध्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत पडलेल्या या पावसासह,फक्त शहरात जुलैमध्ये विक्रमी पाऊस पडण्याची शक्‍यता नसून उर्वरित दोन मान्सून महिनेही पाऊस पडेल असे दिसते. जे दुर्मिळ असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2021 6:34 pm

Web Title: will continue to rain in mumbai chance of record rainfall in july abn 97
टॅग : Mumbai Rain,Rainfall
Next Stories
1 ठाण्यात चेंबूरची पुनरावृत्ती! घरांवर दरड कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू
2 Mumbai Rains: “२०१७ मध्ये मुख्यमंत्री जबाबदार आणि २०२१ मध्ये…”; भाजपा आमदाराचा शिवसेनेला टोला
3 Video : मुंबईत दिवसाढवळ्या वकिलावर तलवारीने हल्ला; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद