“ग्रामपंचायत निवडणुकीत जसं यश मिळालं आहे, तसंच यश पदवीधर निवडणुकीतील देखील आहे. दोन दिवसांतच मी स्फोटक पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामध्ये कशा पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग झाला, हे आपल्या सर्वांसमोर मी मांडणार आहे. पदवीधर निवडणुकीत प्रचंड हेराफेरी झालेली आहे.” असं खळबळजनक विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत आयोजित पत्रकारपरिषदेत केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल समोर येत असून, यामध्ये भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल माहिती देण्यासाठी प्रदेश भाजपा तर्फे पत्रकारपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, “मराठवाडा पदवीधरमध्ये पाच हजार मतपत्रिका कोऱ्या निघाल्या, पुणे पदवीधरमध्ये अडीच हजार नावं ही पदवीपेक्षाही खालचं शिक्षण असलेल्यांची आली. ज्याच्यामध्ये कॉलमध्येच सातवी, आठवी असं लिहिलेलं आहे. ११ हजार नावं दुबार होती.”

“शेवटच्या एक तासांत १३७ , १३८ असं मतदान हे ९०० पैकी ३०० बुथवर झालं आहे. पदवीधरचं एक मतदान होण्यासाठी साधरण तीन मिनिटांचा वेळ लागतो, मी पत्रकारपरिषदेत यांचं प्रात्याक्षिक देखील दाखवणार आहे. असं असताना शेवटच्या ६० मिनिटांमध्ये एवढं मतदान कसं शक्य आहे? एकुणच पदवीधर निवडणुकीत प्रचंड हेराफेरी झालेली आहे. तरीही लोकशाहीमध्ये जो निकाल आला आहे तो आम्ही मान्य केलेला आहे. ते चार पक्ष एकत्र होते व भाजपा एकटीच होती. त्यामुळे एकप्रकारे भाजपाला पदवीधरमध्ये अपयश मिळालं असं मी मानत नाही. पण लोकशाहीमध्ये जो निर्णय येईल तो मान्य करावा लागतो, पुढील निर्णय येईपर्यंत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे व उच्च न्यायालयातही याचिका दाखल होत आहे. या सर्वांमधून आपल्याला काही निवडणुकांची पोलखोल होईल.” असं यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will hold an explosive press conference in the next two days chandrakant patil msr
First published on: 18-01-2021 at 18:57 IST