26 February 2021

News Flash

‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ योजनेत घरावर घर मोफत!

लहानसे का होईना, पण मालकीचे घर असावे असे स्वप्न उराशी बाळगणाऱ्यांसाठी ‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ योजना एक सुवर्णसंधी घेऊन आली आहे.

| March 17, 2015 02:06 am

लहानसे का होईना, पण मालकीचे घर असावे असे स्वप्न उराशी बाळगणाऱ्यांसाठी ‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ योजना एक सुवर्णसंधी घेऊन आली आहे. वेगाने विकसित होत असलेल्या मुंबई परिसरातील घरांचा शोध घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देताना एका घरावर दुसरे नवेकोरे घर जिंकण्याची ही संधी आहे. याशिवाय परदेशी सहल आणि इतर आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधीही ग्राहकांना आहे.
कष्टाने जमवलेल्या पैशांनी स्वप्नातील घर प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक महिने भ्रमंती करावी लागते, हा अनुभव अनेकांना येतो. ग्राहकांच्या गरजांप्रमाणे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल परिसरात आटोपशीर घरांपासून आलिशान बंगल्यांपर्यंतचे सर्व प्रकारचे पर्याय ‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ योजनेत उपलब्ध होत आहेत. त्यात मोफत घरांपासून इतर अनेक बक्षिसांची लयलूटही आहे. या योजनेत सहभागी झालेल्या बांधकाम व्यावसायिकांकडून ३१ मार्चपर्यंत घरखरेदी केलेल्या ग्राहकांनी अर्ज भरून द्यायचा आहे. त्यानंतर काढलेल्या सोडतीत भाग्यवंतांना खरेदी केलेल्या घरासोबतच आणखी एक नवेकोरे घरजिंकण्याची संधी मिळेल. यासोबत परदेशीवारी तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसेही आहेत. या योजनेत सहभागी झालेल्या बांधकाम व्यावसायिकांची नावे व दूरध्वनी क्रमांकांची माहिती शनिवार, २१ मार्चच्या ‘लोकसत्ता वास्तुरंग’मध्ये दिली जाईल.
वास्तुलाभ योजनेसाठी ‘तुलसी इस्टेट’ हे टायटल पार्टनर, ‘मोहन ग्रुप’ हे असोसिएट पार्टनर आणि तर ‘केसरी’ हे ट्रॅव्हल पार्टनर आहेत. स्पर्धेच्या नियम व अटींसाठी ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळाला भेट द्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2015 2:06 am

Web Title: win free home on home in loksatta vasturang vastu labh contest
Next Stories
1 वाली-सुग्रीव भांडणात रामाने बाण का मारला?
2 दिल्लीशी जुळवून घेण्याचा पवारांचा इतिहास !
3 भाजपचा सेनेला सूचक इशारा!
Just Now!
X