News Flash

डोळा मारणं, फ्लाईंग किस करणं लैगिंक छळच; कोर्टाने सुनावली शिक्षा

पोस्को कायद्यांतर्गत आरोपीला १ वर्षाची शिक्षा आणि दंड

मुंबईतील कोर्टाने एका २० वर्षीय आरोपीला अल्पवयीन मुलीला डोळा मारणे आणि फ्लाईंग किस केल्याप्रकरणी एका वर्षाची शिक्षा सुनावली आहे. लैंगिक गुन्हा बाल संरक्षण कायदा म्हणजेच ‘पोस्को’ अंतर्गत कोर्टाने हा निकाल दिला आहे. आरोपीला एका वर्षाची शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरोपीला शिक्षा सुनावताना डोळा मारणे आणि फ्लाईंग किस करणे म्हणजेच लैंगिक छळ असल्याचं मतही कोर्टाने नोंदवलं आहे.

२९ फेब्रुवारी २०२० रोजी १४ वर्षीय पीडित मुलगी आपल्या बहिणीसोबत घराबाहेर जात असताना आरोपीने तिला डोळा मारला आणि फ्लाईंग किस केलं. आरोपीच्या कृत्यामुळे १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी मानसिक तणावात होती. या घटनेनंतर पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी एलटी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या.

मुंबईकरांनो चॉईस ठेवू नका, मृत्यू वाढतायेत; महापौरांनी केलं महत्त्वाचं आवाहन

आरोपी यापूर्वी देखील पीडित तरुणीसोबत असाच वागत होता. मुलीने याबाबत अनेकदा तिच्या आईला सांगितलं होतं. पीडित तरुणीच्या घरच्यांनी तरुणाला समजही दिली होती. मात्र कृतीत काहीच फरक न पडल्याने अखेर पोलिसांत तक्रार दिली.

‘हे काय वागणं आहे’, लग्नाच्या दोन महिन्यात सिद्धार्थ-मितालीमध्ये भांडण?

आरोपीने कोर्टात पीडित मुलीच्या बहिणीसोबत ५०० रुपयांची पैज लागल्याचं कारण पुढे करत कृत्य केल्याचं सांगितलं. मात्र पैज लावल्याचा कोणताच पुरावा मिळाला नाही. त्यामुळे कोर्टाने पीडित तरुणीच्या बाजूने निर्णय देत आरोपीला शिक्षा सुनावली. आरोपीला एक वर्षीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर आरोपीला १५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. त्यापैकी १० हजार रुपये पीडित मुलीला देण्यास सांगितले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2021 3:03 pm

Web Title: winking and giving flying kisses is sexual harassment mumbai court get imprisonment to accused rmt 84
टॅग : Crime News,Mumbai News
Next Stories
1 “दुसऱ्याच्या ताटात काय वाढलंय, हे पाहण्या पेक्षा आपलं ताट रिकामं… ”
2 पृथ्वीराज चव्हाणांनी खरी आकडेवारी लपवली; भाजपाकडून प्रत्युत्तर
3 महाराष्ट्राने ओलांडला मोठा टप्पा; एक कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण
Just Now!
X