राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आपल्या तंबाखू आणि सुपारीच्या व्यसनाबद्दल खेद व्यक्त केला आहे. ४० वर्षांपूर्वी या जीवघेण्या व्यसनाच्या आहारी जाण्यापासून आपल्याला कोणीतरी रोखायला हवं होतं असंही त्यांनी म्हटलं आहे. इंडियन डेन्टल असोसिएशनच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. इंडियन डेन्टल असोसिएशनने २०२२ पर्यंत तोंडाच्या कर्करोगावर पुर्णपणे नियंत्रण आणण्याचा निर्धार केला आहे.

जीवघेण्या कॅन्सरवर मात करुन पुन्हा जोमाने आयुष्याचा प्रवास सुरु केलेल्या शरद पवारांनी कार्यक्रमात आपले मत मांडले. यावेळी त्यांनी आपल्याला कॅन्सर झाल्यावर झालेला त्रास, उपचार घेताना झालेल्या वेदना सांगितल्या. ‘सर्जरीमुळे आपल्याला प्रचंड त्रास झाला. आपले दात काढण्यात आल्याने तोंड पुर्णपणे उघडण्यास त्रास होत होता. बोलताना आणि अन्न गिळतानाही असह्य वेदना व्हायच्या’, असं शरद पवारांनी सांगितलं. यावेळी बोलताना शरद पवारांनी इंडियन डेन्टल असोसिएशनला लागेल ती सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Gudi Padwa 2024
गुढीपाडव्यापासून ‘या’ ३ राशी होतील श्रीमंत? नववर्षात शनिदेवाच्या कृपेने उत्पन्नात होऊ शकते प्रचंड वाढ
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

२००४ मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान शरद पवारांना कॅन्सर असल्याची माहिती मिळाली होती. उपचारासाठी ते न्यूयॉर्कला गेले होते. तेथील डॉक्टरांनी त्यांना भारतातील काही तज्ञ डॉक्टरांकडे उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी कृषीमंत्रीपद सांभाळणा-या शरद पवारांना ३६ वेळा रेडिएशन ट्रिटमेंट घ्यायची होती. हे प्रचंड वेदनादायी होतं असं एकदा शरद पवारांनी सांगितलं होतं. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत शरद पवार आपल्या मंत्रालयात काम करत असत. नंतर २.३० वाजता अपोलो रुग्णालयात केमिओथेरपी घेत असत. यावेळी एका डॉक्टराने तुमच्याकडे फक्त सहा महिने असून महत्वाची कामे उरकून घ्या असं सांगितलं होतं. त्यावेळी शरद पवारांनी मला आजाराची चिंता नाही, तुम्हीही करु नका असं म्हटलं होतं. कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर मात करणारे शरद पवार लोकांना तंबाखूच व्यसन न करण्याचं आवाहन करत असतात.