05 July 2020

News Flash

तीन दिवसांत युतीतील जागावाटपाचा तिढा सुटणार – महाजन

उर्वरित जागांसाठी निष्ठावंतांचा विचार होईल.

संग्रहित छायाचित्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवारी महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिकमध्ये होणार असून या वेळी युतीसंदर्भात कोणतीही घोषणा होणार नाही. परंतु, जागावाटपाचा तिढा पुढील तीन दिवसांत सुटेल, असा दावा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रमाच्या नियोजनाविषयी महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युती झाल्यास २४० हून अधिक जागा निवडून येतील. शिवसेनेने नुकतीच २८८ जागांसाठी आढावा बैठक घेतली. त्यांना तसा अधिकार आहे. भाजपतर्फेही राज्यात अशा पद्धतीने सर्वेक्षण झाले आहे. ज्यांचे काम चांगले आहे, जनतेशी ज्यांची नाळ जुळलेली आहे, अशा नेत्यांना पक्षात सामावून घेतले आहे. निवडणुकीत अशा १५ मातब्बर नेत्यांना तिकिटे दिले जातील. उर्वरित जागांसाठी निष्ठावंतांचा विचार होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2019 2:11 am

Web Title: within three days the alliance will be shattered girish mahajan abn 97
Next Stories
1 केंद्रीय निवडणूक आयुक्त दोन दिवस मुंबईत
2 राज्य अन्न आयोगासाठी सरकारवर बडगा
3 लोकलमधील धक्काबुक्कीमुळे कर्करोगग्रस्त बालिकेचा मृत्यू
Just Now!
X