News Flash

सासूने सुनेला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडलं आणि त्यानंतर…

सासूने घरामध्येच सुनबाईला....

संग्रहित छायाचित्र

एका वृद्ध महिलेच्या हत्या प्रकरणात बोरिवली पोलिसांनी तिच्या सुनेला आणि एका तरुणाला अटक केली आहे. पोलिसांच्या अटकेत असलेल्या सूनबाईचे आणि त्या तरुणाचे प्रेमसंबंध होते.

हत्या का केली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनेने आणि तिच्या प्रियकराने हत्येच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. बोरिवली उपनगरातील महात्मा फुले वस्तीतून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. आरोपी युवक महिलेच्या घरी जायचा. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.

मागच्या आठवडयात सासूने घरामध्येच सुनबाईला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडले. त्यानंतर तिने हा सर्व प्रकार मुलाच्या कानावर घालण्याची सूनेला धमकी दिली असे पोलिसांनी सांगितले. आपले बिंग फुटेल या भीतीपोटी दोघांनी सासूची हत्या करण्याचा कट रचला. त्यानुसार, सासू घरामध्ये असतानाच त्यांनी डोक्यात दगड घालून तिची हत्या केली असे पोलिसांनी सांगितले. आरोपी तरुण नेहमी घरी यायचा, असे कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांना सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2020 12:10 pm

Web Title: woman and lover nabbed for killing her mother in law dmp 82
Next Stories
1 … आता यांच्या मुलांची लग्नही आपल्याच पैशातून होतील असं वाटतंय; नितेश राणेंचा टोला
2 मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु होणार, ठाकरे सरकारचे संकेत
3 आरोग्याचा निधी वापराविना
Just Now!
X