News Flash

पालिका रुग्णालयात महिलेवर हल्ला

जोगेश्वरी येथील आरोग्य केंद्रातील महिलेला चाकूचा धाक दाखवून, तसेच तिला मारहाण करून दहशत पसरविणाऱ्या गुंडास तातडीने अटक करावी, अन्यथा महापालिकेतील सर्व महिला कर्मचारी रस्त्यावर उतरतील,

| January 15, 2013 02:25 am

जोगेश्वरी येथील आरोग्य केंद्रातील महिलेला चाकूचा धाक दाखवून, तसेच तिला मारहाण करून दहशत पसरविणाऱ्या गुंडास तातडीने अटक करावी, अन्यथा महापालिकेतील सर्व महिला कर्मचारी रस्त्यावर उतरतील, असा इशारा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने दिला आहे.
१० जानेवारीला जोगेश्वरीतील आजगांवकर प्लॉट येथे असणाऱ्या आरोग्य केंद्राची झाडलोट करीत असताना आरोग्य केंद्रात घुसून वर्षां चव्हाण या आयाबाईला चाकूचा धाक दाखवून गळा दाबण्याचा प्रयत्न एका गुंडाने केला होता. यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पण चार दिवसांनंतरही त्या व्यक्तीला अटक करण्यात आली नाही. त्यामुळे त्या आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने पालिकेच्या के/पूर्व विभाग कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला होता. त्या वेळी तीव्र निदर्शनांचा इशारा देण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2013 2:25 am

Web Title: woman attacked in bmc hospital
Next Stories
1 तांत्रिक बिघाडामुळे प. रे. विस्कळीत
2 पाकिस्तानविरोधात शिवसेनेची निदर्शने
3 शिवसेनेकडून प्रतिसाद नसल्याने रिपाइंमध्ये घालमेल
Just Now!
X