News Flash

सोनसाखळी चोरणारी महिला टोळी अटकेत

सराईतपणे महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या तीन महिलांच्या एका टोळीला ठाणे पोलिसांनी नुकतीच अटक केली. एसटीमधून प्रवास करीत असताना या महिलांनी एका सहप्रवाशी महिलेच्या पर्समधील मंगळसूत्र

| August 31, 2014 04:41 am

सराईतपणे महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या तीन महिलांच्या एका टोळीला ठाणे पोलिसांनी नुकतीच अटक केली. एसटीमधून प्रवास करीत असताना या महिलांनी एका सहप्रवाशी महिलेच्या पर्समधील मंगळसूत्र चोरले. मात्र वाहतूक पोलिसाने या बसचा पाठलाग करीत ही बस अडवली आणि या तीनही महिलांना अटक केली. या महिलांना राबोडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भिवंडी येथून सुनीता ठाकरे या एसटीने ठाण्याला निघाल्या होत्या. माणकोली येथे तीन महिला या बसमध्ये चढून ठाकरे यांच्या जवळ बसल्या. त्यांनी प्रवासादरम्यान ठाकरे यांच्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र चोरले. ही बस ठाण्यातील मुक्ताई आगार परिसरात आल्यानंतर सुनीता ठाकरे या बसमधून उतरल्या, मात्र मंगळसूत्र चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी या भागात वाहतूक पोलीस म्हणून कार्यरत असलेल्या शिवाजी पवार यांना ही माहिती दिली. पवार यांनी बसचा पाठलाग करून ऋतुपार्क क्रॉस रोडवर ही बस थांबवली. पवार यांनी चौकशी केल्यानंतर या बसमधील कल्याणी एन्तिकल्लू या महिलेनेच मंगळसूत्र बाहेर फेकल्याचे उघड झाले. पवार यांनी तिच्यासह तिच्या सहकारी अन्नपूर्णा एन्तिकल्लू व सोनी एन्तिकल्लू यांना ताब्यात घेतले आणि राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा
दाखल केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2014 4:41 am

Web Title: woman chain snatcher arrested
टॅग : Chain Snatcher
Next Stories
1 तरुणांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी ‘आयडिएट’
2 पुणे-मंत्रालय मार्गावर सोमवारपासून ‘शिवनेरी’
3 लांबपल्ल्याच्या रेल्वे गाडय़ांच्या वेळापत्रकात बदल
Just Now!
X