News Flash

पूजेच्या नावाखाली महिलेची फसवणूक

मूल होण्यासाठी पूजा करावी लागेल, असे सांगत उर्वशी धकान या महिलेकडून एक लाखाचे दागिने लंपास करणाऱ्या दोन भामटय़ांना एमएचबी पोलिसांनी अटक केली आहे.

| March 27, 2014 05:28 am

मूल होण्यासाठी पूजा करावी लागेल, असे सांगत उर्वशी धकान या महिलेकडून एक लाखाचे दागिने लंपास करणाऱ्या दोन भामटय़ांना एमएचबी पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे हे दोघे तृतीयपंथी बनून घरात शिरले होते.  बोरिवलीत राहणाऱ्या धकान यांच्या घरी हे दोघे तृतीयपंथीय म्हणूनआले होते. तुमच्या जावेला मूल होत नाही. यावर उपाय म्हणून पूजा करावी लागेल, तसेच २० वर्षांत सुमारे ४ लाख रुपये मंदिरात दान करावे लागतील, असे सांगितले होते. उर्वशी दोघांच्या भूलथापांना बळी पडल्या आणि त्यांनी घरातील १ लाख रुपये किमतीच्या चार सोन्याच्या बांगडय़ा त्यांच्या स्वाधीन केल्या. पोलिसांनी दोघांना अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2014 5:28 am

Web Title: woman cheated in the name of worship
Next Stories
1 प्रवासी आरक्षण केंद्रातील आगीत दोन जवान जखमी
2 मुंबई महानगरपालिकेची ७०० कोटींचा कामे अपूर्ण
3 वकासचा ताबा मिळविण्यासाठी एटीएसचे अधिकारी उत्सुक
Just Now!
X