22 January 2021

News Flash

महिलेची आत्महत्या

आयशा हिचा सहा वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता

मुंबई : वांद्रे येथे एका महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आयशा शेपन शेख (२४) असे मृत महिलेचे नाव असून, नैराश्यातून तिने हे पाऊल उचलल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.

आयशा हिचा सहा वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. त्यानंतर वांद्रे येथील नर्गीस दत्तनगर परिसरात ती वास्तव्याला होती. तिला विविध व्याधींनी ग्रासले होते. तसेच ती व्यसनांच्या आहारी गेली होती. त्यातून तिची मानसिक स्थिती बरी नव्हती.

आयशा हिच्याशी संपर्क होत नसल्याने तिची मैत्रीण आणि आई शनिवारी तिच्या घरी गेले. या वेळी ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तीन दिवसांपूर्वी आयशाने गळफास घेतल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2020 12:03 am

Web Title: woman commits suicide zws 70
Next Stories
1 “अ‍ॅमेझॉनला धडा शिकवला…”; मनसे नेत्याने केलं ट्विट
2 भाजपाच्या आशिष शेलारांनी केलं उद्धव ठाकरेंच्या मुलाचं तोंडभरून कौतुक, म्हणाले…
3 खडसेंना ईडी नोटीस पाठवण्यावरुन संजय राऊत संतापले; म्हणाले…
Just Now!
X