News Flash

माटुंग्यात महिलेवर सामूहिक बलात्कार

बलात्काराच्या घटनांना चाप लावण्यासाठी कठोर कायद्याची तरतूद करण्याची चर्चा उच्चरवाने केली जात असतानाच बलात्काराच्या घटनांमध्ये वाढच होत आहे. महिलांसाठी सुरक्षित समजली जाणारी मुंबापुरीही त्यास अपवाद

| March 17, 2013 02:48 am

बलात्काराच्या घटनांना चाप लावण्यासाठी कठोर कायद्याची तरतूद करण्याची चर्चा उच्चरवाने केली जात असतानाच बलात्काराच्या घटनांमध्ये वाढच होत आहे. महिलांसाठी सुरक्षित समजली जाणारी मुंबापुरीही त्यास अपवाद ठरू शकलेली नाही. घरात घुसून सातजणांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री माटुंग्यात घडली. पीडित महिला माटुंगा रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक चारच्या शेजारील झोपडट्टीत पतीसमवेत राहते. रेल्वेलाइनलगतचा भाजीपाला पिकवून हे दाम्पत्य उदरनिर्वाह करते. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास याच परिसरात राहणारे सिद्धू आणि अनुप हे दोन तरुण पाच साथीदारांसह या महिलेच्या घरात घुसले. त्यांनी महिलेच्या पतीला मारहाण करून घराबाहेर हाकलले. त्यानंतर या नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. महिला व तिच्या पतीने शनिवारी दादर रेल्वेस्थानक पोलिसांत तक्रार नोंदवली. रेल्वे पोलिसांनी हा गुन्हा माटुंगा पोलीस ठाण्याकडे वर्ग केला. अनुप आणि सिद्धू यांना पीडित महिला गेल्या तीन वर्षांपासून ओळखत होती, अशी माहिती रेल्वेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त राजेश्वरी रेडकर यांनी दिली. याप्रकरणी शनिवारी रात्री उशिरापर्यंत कोणासही अटक झाली नव्हती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 2:48 am

Web Title: woman gangraped in matunga slum
Next Stories
1 कल्याण-डोंबिवलीत रिक्षांचे मीटर ‘डाऊन’ होणार!
2 भाडेतत्त्वावरील घरे की रास्त दरातील हक्काची घरे ?
3 पवारांचे दुष्काळी गणित काँग्रेसला तापदायक
Just Now!
X