04 August 2020

News Flash

जुन्या वादातून शेजाऱ्याच्या मुलाचा खून

गल्लीत थुंकणे आणि नळावर पाणी भरण्यावरून या दोन कु टुंबांमध्ये वाद होते.

प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई : अंधेरीत किरकोळ वादातून एका २९ वर्षीय महिलेने शेजाऱ्याच्या चार वर्षीय चिमुकल्याचा गळा आवळून खून केला. गल्लीत थुंकणे आणि नळावर पाणी भरण्यावरून या दोन कु टुंबांमध्ये वाद होते. मधू गाडे असे आरोपी महिलेचे नाव असून पोलिसांनी तिला अटक केली आहे. तर श्रेयस कदम असे चिमुकल्याचे नाव आहे.

सहार रस्त्यावर संतोषीमाता नगर परिसरात कदम कुटुंबीय वास्तव्याला आहे. त्यांच्या शेजारीच गाडे या पती आणि मुलांसह राहतात. मागील बऱ्याच दिवसांपासून त्या आजारी आहेत. गल्लीत थुंकण्यावरून गाडे यांचे कदम यांच्याबरोबर काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्याचा राग त्यांच्या मनात होता. सोमवारी सायंकाळच्या सुमारास घराबाहेर खेळत असलेल्या श्रेयसला त्यांनी घरी बोलावून घेतले. यावेळी पायजम्याने त्यांनी त्याचा गळा आवळला. त्यानंतर त्याला पाण्यात बुडवून त्याची हत्या केली. बराच वेळ श्रेयस दिसत नसल्याने त्याच्या आईने शोधाशोध सुरू केली. तसेच शेजाऱ्यांच्या घरांची पाहणी सुरू केली. मात्र गाडे यांनी त्यांच्या घराची पाहणी करू देण्यास नकार दिला. संशय आल्याने कदम यांनी परिसरातील महिलांसह गाडे यांच्या घराची पाहणी केली. यावेळी घरातील बाथरूममध्ये श्रेयस मृतावस्थेत आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी गाडे यांना अटक केली आहे. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 3:29 am

Web Title: woman held for killing neighbour four year old son in andheri zws 70
Next Stories
1 मानखुर्दमधील अंध व्यक्तीकडून रक्तद्रव दान
2 पार्लर, केशकर्तनालयांसाठी शासकीय नियमावली
3 लांबपल्ल्याच्या गाडय़ा सुरू करा!
Just Now!
X