News Flash

मुंबईत महिलेचं आठ महिन्यांपासून आईच्या मृतदेहासोबत वास्तव्य, धक्कादायक प्रकाराने पोलीसही चक्रावले

मार्च महिन्यात झाला होता महिलेचा मृत्यू

प्रातिनिधिक

मुंबई पोलिसांना वांद्रे येथील घरात ८३ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मार्च महिन्यातच महिलेचा मृत्यू झाला आहे. मात्र यानंतरही महिलेच्या ५३ वर्षीय मुलीने याबाबत कोणालाही माहिती दिली नाही. मुलगी गेल्या आठ महिन्यांपासून आईच्या मृतदेहासोबतच राहत होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. महिलेच्या शेजाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली असता हा प्रकार उघडकीस आला. मुंबई मिररने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

महिलेची मुलगी घऱाच्या खिडकीतून कचरा फेकत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस घरी पोहोचले असता मुलगी संपूर्ण लॉकडाउनदरम्यान आपल्या आईच्या मृतदेहासोबत घरात राहत असल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या निदर्शनास आली.

पोलिसांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता महिलेच्या मुलीची मानसिक स्थिती योग्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळेच मुलीने आईच्या मृतदेहासोबत कोणाला माहिती दिली नसावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. महिलेने काही वर्षांपूर्वी आपल्या कुत्र्याचा मृत्यू झाल्यानंतरही अशाच पद्दतीने कोणाला न कळवता घरात मृतदेह ठेवला होता अशी माहिती तपासात समोर आली आहे.

दरम्यान महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तसंच आईच्या मृत्यूसंबंधी विचारण्यात आलेलं प्रश्न, मृत्यूचं कारण यासंबंधी काहीही उत्तर देऊ न शकल्याने मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2020 9:26 am

Web Title: woman in mumbai found living with mothers corpse sgy 87
Next Stories
1 करोनाकाळातील आहारसूत्राबाबत आज ऋजुता दिवेकर यांच्याशी संवाद
2 अस्थायी कर्मचाऱ्यांचे आजपासून धरणे आंदोलन
3 अंतिम निवडीनंतर विद्यार्थिनीचा प्रवेश रद्द
Just Now!
X