19 January 2019

News Flash

मुंबईत आयपीएल सामन्यादरम्यान तरुणीचा विनयभंग

शनिवारी वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यात सामना पार पडला. हा सामना पाहण्यासाठी २२ वर्षांची तरुणी आली होती.

प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबईत आयपीएल सामन्यादरम्यान २२ वर्षांच्या तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी जनराज सतनामी (वय २६) या तरुणाला त्याला अटक केली आहे.

शनिवारी वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यात सामना पार पडला. हा सामना पाहण्यासाठी २२ वर्षांची तरुणी आली होती. सामना सुरु असताना मैदानातील कर्मचारी सतनामी तिच्या बाजूला येऊन बसला. त्याने त्या तरुणीला पाण्यासाठी विचारले. तरुणीने त्याला नकार दिला. मात्र, यानंतरही सतनामी थांबला नाही. त्याने तरुणीशी वारंवार बोलण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याने तरुणीसोबत असभ्य वर्तनही केले. शेवटी तरुणीने आरडाओरडा सुरु करताच सतराज तिथून पळून गेला.

तरुणीने मैदानातील पोलिसांना या घटनेची माहिती दिली. काळा टी शर्ट घातलेल्या तरुणाने विनयभंग केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. तरुणीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सतनामीला अटक केली. सतराजला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

First Published on April 16, 2018 11:18 am

Web Title: woman molested at wankhede stadium during ipl match hospitality staff member arrested