19 November 2019

News Flash

महिला वैमानिकावर नवऱ्याची अनैसर्गिक सेक्ससाठी जबरदस्ती, मुंबईत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

एका आघाडीच्या एअरलाइन्समध्ये काम करणाऱ्य़ा महिला वैमानिकाने नवऱ्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. तिने नवऱ्याविरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

( संग्रहीत छायाचित्र )

भारतातील एका आघाडीच्या एअरलाइन्समध्ये काम करणाऱ्य़ा महिला वैमानिकाने नवऱ्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. तिने नवऱ्याविरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. नवऱ्याने आपल्याला मारहाण केली तसेच जबरदस्तीने अनैसर्गिक संभोग केला असे आरोप या महिला वैमानिकाने केले आहेत.

मिड डे ने दिलेल्या वृत्तानुसार महिलेचा नवरा बिझनेसमॅन असून त्याचा गुजरातमध्ये काचेचा व्यवसाय आहे. सत्र न्यायालयाने या महिलेच्या पतीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तो फरार झाला असून पोलीस त्याच्या शोधात आहेत. पीडित महिला वैमानिकाने नोंदवलेल्या तक्रारीत नवऱ्याचे सौंदर्य स्पर्धा जिंकणाऱ्या एका महिलेबरोबर अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला आहे.

नवऱ्याने आपल्याला मारहाण केली तसेच मद्यपान केल्यानंतर जबरदस्तीने अनैसर्गिक शरीरसंबंधास भाग पाडले असा या महिलेने आरोप केला. आरोपी पेशाने बिझनेसमॅन असून गुजरातमध्ये त्याचा काचेचा मोठा व्यवसाय आहे. तक्रारदार महिलेने नवऱ्याचे अहमदाबाद येथील घर सोडले असून सध्या ती वांद्रयात राहते.

मी मुंबईत आल्यानंतर नवरा आजारी असल्याचे आपल्याला समजले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जेव्हा मी त्याला पाहण्यासाठी रुग्णालयात पोहोचले तेव्हा त्याच्या शेजारी एक महिला बसली होती. ही महिला एका सौंदर्य स्पर्धेची विजेती असून तिचे आणि आपल्या नवऱ्याचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप तिने केला आहे. तक्रारदार महिलेच्या लग्नाला दीडवर्षच झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

First Published on June 14, 2018 4:03 pm

Web Title: woman pilot in mumbai accusess husband of unnatural sex
Just Now!
X