News Flash

चोरांच्या झटापटीत महिला जखमी

शहाबाई उबाळे असे या जखमी महिलेचे नाव असून त्या घाटकोपरच्या रमाबाई नगर येथे राहतात.

मुंबई : कामावर जात असलेल्या एका ५२ वर्षीय महिलेवर सोनसाखळी चोरटय़ांनी केलेल्या हल्लय़ात ही महिला गंभीर जखमी झाली.  रविवारी घाटकोपरच्या पूर्व द्रुतगती मार्गावर हा प्रकार घडला. पंतनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तीन आरोपींना अटक केली आहे. मात्र या महिलेच्या डोक्याला मार लागल्याने तिची प्रकृती गंभीर आहे.

शहाबाई उबाळे असे या जखमी महिलेचे नाव असून त्या घाटकोपरच्या रमाबाई नगर येथे राहतात. गेल्या अनेक वर्षांपासून त्या गारोडिया नगर परिसरात असलेल्या एका खासगी रुग्णालयात आया म्हणून काम करतात. रविवारी नेहमीप्रमाणे त्या कामावर जात होत्या. इतक्यात पूर्व द्रुतगती मार्गावर दुचाकीवरून आलेल्या दोन चोरटय़ांनी पहिल्यांदा त्यांचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्याकडील पर्सही चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी याला प्रतिकार केला असता चोरटय़ांनी त्यांना रस्त्यावरून काही अंतर फरफटत नेले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली.

काही स्थानिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांना तत्काळ शहाबाई यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सध्या शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंतनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर सीसीटीव्हीच्या चित्रणावरून सोमवारी तीन जणांना अटक केली, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 12:11 am

Web Title: woman seriously injured in the attack by chain snatcher zws 70
Next Stories
1 लोकलसाठी सर्वसामान्यांचा वारंवार उद्रेक
2 बडतर्फ बेस्ट कर्मचारी कामावर रुजू
3 बेस्ट वाहक ६५ दिवसानंतर करोनामुक्त
Just Now!
X