News Flash

चार वर्षांच्या मुलासह महिलेची आत्महत्या

बदलापूर येथील बेलवली भागात एका महिलेने आपल्या चार वर्षांच्या मुलासह इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. ‘

| July 7, 2015 02:04 am

बदलापूर येथील बेलवली भागात  एका महिलेने आपल्या चार वर्षांच्या मुलासह इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. ‘ग्रीन लॉन्स’ या कॉम्प्लेक्समध्ये सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. उषाबेन जाडेजा (वय ३०) आणि अजय (वय ४) अशी मृतांची नावे आहेत. अजय याला शिकवणीसाठी घेऊन जाते असे सांगून घरातून उषाबेन बाहेर पडल्या; मात्र त्यानंतर त्यांनी इमारतीवरून उडी घेतल्याची बातमी कुटुंबियांना कळाली.  उषाबेन यांचे पती विजय याचे भांडूप येथे किराणा मालाचे दुकान आहे. आकडीचा आजार होता,  असे सासरच्या लोकांनी सांगितले. एक महिन्यापूर्वीच जाडेजा कुटुंबीय बदलापुरात राहायला आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक वांढेकर यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2015 2:04 am

Web Title: woman suicide with her four years children
Next Stories
1 कंत्राटी कामगारांची नियुक्ती रखडली
2 केंद्राच्या गृहनिर्माण कायद्यास राज्याचा विरोध
3 गुडघा, खुब्याची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आता राजीव गांधी योजनेतून!
Just Now!
X