News Flash

मुलाला घरातून पळवण्यासाठी आईने पोलिसांवर फेकली मिरची पूड

मालवणी भागातील घटना....

पोलीस आरोपीला पकडण्यासाठी घरी आले होते. पण आईनेच मुलाला घरातून पळून जाण्यासाठी मदत केली. आरोपी मुलाला पळून जाण्यात मदत व्हावी म्हणून एका महिलेने पोलिसांच्या डोळ्यांवर मिरची पूड फेकली. मुंबईच्या मालवणी भागात शुक्रवारी ही घटना घडली.

या प्रकारानंतर पोलिसांनी त्या महिलेला अटक केली. महिलेच्या मुलाला अटक करण्यासाठी पोलीस अंबुजवाडी भागात पोहोचले, त्यावेळी ही घटना घडली. आपला मुलगा पोलिसांच्या तावडीत सापडू नये, म्हणून या महिलेने पोलिसांच्या डोळ्यावर मिरची पूड फेकली.

मालवणी पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे. मुलगा घरातून पसार झाला पण पोलिसांनी त्याला नंतर मालाडमधूनच अटक केली. ३५३, ३३२,५०४, ५०६, ५०९ या कलमांतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2020 11:34 am

Web Title: woman throws chilli powder at mumbai cops to help accused son escape dmp 82
Next Stories
1 मेट्रो प्रकल्पात मिठाचा खडा टाकू नका : मुख्यमंत्री
2 ३३ लाख ७१ हजार संशयित विलगीकरणातून मुक्त
3 मराठी चित्रपटांचे प्रदर्शन डिसेंबरनंतरच
Just Now!
X