News Flash

विवाहबाह्य संबंधांच्या रागातून बायकोने ७५ वर्षाच्या नवऱ्याची केली हत्या

डोक्यात पेव्हर ब्लॉक घातला

प्रतिनिधिक छायाचित्र

एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेने ७५ वर्षाच्या पतीची डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून हत्या केली. नवऱ्याच्या रोजच्या छोटया छोटया विषयांवरुन वाद घालण्याच्या स्वभावाला ही महिला कंटाळली होती तसेच नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या तिला संशय होता. त्याच रागातून तिने नवऱ्याची हत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले. मुंबईत चेंबूरमधल्या झोपडपट्टीत रविवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. नवरा घराबाहेर झापलेला असताना या महिलेने डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून नवऱ्याची हत्या केली. तसेच कोणालाही आपल्यावर संशय येऊ नये यासाठी ही महिला नवऱ्याच्या मृतदेहाशेजारी सकाळपर्यंत झोपून होती.

धानूदेवी असे आरोपी महिलेचे नाव आहे. छोटेलाल मौर्यबरोबर तिने जवळपास ४० वर्ष संसार केला. छोटेलाल मौर्यचे दोन महिलांबरोबर अनैतिक संबंध असल्याचा तिला संशय होता असे पोलिसातील सूत्रांनी सांगितले. रविवारी सकाळी टिळक नगर पोलिसांना चेंबूरच्या कृष्ण मेनन नगरमध्ये एक वृद्ध व्यक्ति रक्ताच्या थारोळयात पडली असल्याचा संदेश मिळाला. पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी लगेच छोटेलालला राजावाडी रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी छोटेलालला मृत घोषित केले.

सुरुवातीला धानूदेवीने छोटेलालचा मृत्यू कसा झाला ते आपल्याला माहित नाही असे सांगितले होते. राजावाडी रुग्णालयातील डॉक्टरांनी छोटेलालच्या डोक्यावर जखमा असल्याचे पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी लगेच हत्येचा गुन्हा दाखल केला. चौकशी दरम्यान धानूदेवीशिवाय घरात कोणीच प्रवेश केला नसल्याचे पोलिसांना समजले. अखेर पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच धानूदेवीने गुन्ह्याची कबुली दिली. हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी धानूदेवीला अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 12:05 pm

Web Title: women killed 75 year old husbund over affair
Next Stories
1 भंडाऱ्याची वाघीण! बिबट्याशी दिली झुंज
2 दोन दिवसांत येतोय…! शहीद शुभम मुस्तापुरेंनी केला होता कुटुंबीयांना फोन
3 बाबांच्या हातून निसटली अन्… ! कल्याणच्या दोन वर्षांच्या मुलीचा केरळात बुडून मृत्यू
Just Now!
X