22 October 2020

News Flash

ठाकरे सरकारची कोंडी? महिलांच्या लोकल प्रवासाला अजून केंद्रीय रेल्वे बोर्डाची मंजुरी नाही

रेल्वे अधिकारी आणि राज्य सरकारमध्ये संयुक्त बैठक आवश्यक

एकीकडे उद्धव ठाकरे सरकारने सरसकट सर्व महिलांना लोकल प्रवासासाठी १७ ऑक्टोबर पासून मुभा दिली आहे. तरीही अद्याप यासाठी केंद्रीय रेल्वे बोर्डाने मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे महिलांना सरसकट लोकलमधून प्रवास करता येणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे. काही वेळापूर्वीच ठाकरे सरकारने याबाबतची घोषणा केली असली तरीही केंद्रीय रेल्वे बोर्डाने यासाठी मंजुरी दिलेली नाही. पश्चिम रेल्वेने याबाबत एक पत्रक काढलं आहे.

 

काय म्हटलं आहे पत्रात?
सरसकट सगळ्या महिलांना लोकल प्रवासाची मुभा दिल्यास प्रवाशांची संख्या वाढेल. त्यामुळे कोविड संदर्भातले नियम किती पाळले जातील ? सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाईल का? या सगळ्याबाबत रेल्वे अधिकारी आणि राज्य सरकार यांच्यात संयुक्त बैठक झाली पाहिजे त्यामध्ये राज्य सरकारने हे सांगितलं पाहिजे की सरसकट महिलांना प्रवासाची मुभा देणं कसं शक्य आहे. त्यानंतर हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल. रेल्वे बोर्डाने मंजुरी दिल्यानंतर सरसकट सगळ्या महिलांना लोकल प्रवास कधीपासून करता येईल त्याची तारीख ठरवता येईल.

या आशयाचा मजकूर या पत्रात आहे त्यामुळे उद्यापासून म्हणजेच १७ तारखेपासून सरसकट सगळ्या महिलांचा लोकल प्रवास होणं सध्या तरी कठीणच आहे. यामुळे ठाकरे सरकारची कोंडी झाली आहे का? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 8:33 pm

Web Title: women local travel has not yet been approved by the central railway board scj 81
Next Stories
1 इराकमधल्या ‘ब्ल्यू बेबी’वर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया
2 मुंबई लोकलचे दरवाजे महिलांसाठी खुले; पुरुषांसाठी मात्र Work From Home
3 ‘फिल्मसिटी मुंबईबाहेर नेण्याचं कारस्थान’, कधी नव्हे तो मनसेचा उद्धव ठाकरेंच्या सुरात सूर
Just Now!
X