18 September 2020

News Flash

महिला मोटारसायकल प्रशिक्षक चेतना पंडित यांची आत्महत्या

चेतना पंडित (वय २७ वर्ष) या गोरेगावमधील पद्मावती नगर अपार्टमेंट येथे चार मैत्रिणींसह राहत होत्या. सोमवारी रात्री घरी कोणीही नसताना त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली

चेतना पंडित या एनफिल्ड रायडर ग्रुपच्या रोड कॅप्टन होत्या.

महिला मोटारसायकल प्रशिक्षक चेतना पंडित यांनी सोमवारी रात्री आत्महत्या केली. प्रियकराशी ब्रेक अप झाल्याने त्या नैराश्यात होत्या. यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असे सूत्रांनी सांगितले. चेतना पंडित या एनफिल्ड रायडर ग्रुपच्या रोड कॅप्टन होत्या.

चेतना पंडित (वय २७ वर्ष) या गोरेगावमधील पद्मावती नगर अपार्टमेंट येथे चार मैत्रिणींसह राहत होत्या. सोमवारी रात्री घरी कोणीही नसताना त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मैत्रिणी फ्लॅटमध्ये परतल्या असता चेतना या दरवाजा उघडत नव्हत्या. चेतना यांचा मोबाईल फोनदेखील नॉट रिचेबल होता. अखेरीस त्यांनी चावीवाल्याच्या मदतीने दरवाजा उघडला असता चेतना यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले. चेतना यांचे प्रियकराशी ब्रेक अप झाले होते. यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे.

चेतना यांच्यासोबत राहणाऱ्या मैत्रिणींनी एका इंग्रजी वृत्तपत्राला प्रतिक्रिया दिली. ‘चेतनाने कधीच आम्हाला त्रास दिला नाही. ती तिच्या बाईकमध्ये रमायची. ती बहुतांशी वेळा एनफिल्ड टूरसाठी मुंबईबाहेरच असायची. तिने हे टोकाचे पाऊल का उचलले हेच समजत नाही, असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 12:58 pm

Web Title: women motorcycle coach chetna pandit commits suicide in goregaon
Next Stories
1 उमरोळीत संतप्त प्रवाशांचा रेलरोको
2 २४ तासानंतरही पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीतच
3 मुंबई मेट्रो-३ प्रकल्पामध्ये ५ किमीचे भुयारीकरण पूर्ण
Just Now!
X