News Flash

‘आयआयटी’मध्ये महिला संशोधकासाठी अध्यासन

आयआयटीतील महिला प्राध्यापकांना प्रोत्साहन देण्याच्या संस्थेच्या प्रयत्नांना दीक्षित यांनी आजवर पाठिंबा दिला आहे

‘भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (आयआयटी) मुंबई

मुंबई : तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी ‘भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (आयआयटी) मुंबई’ येथे प्रथमच स्वतंत्र अध्यासन स्थापन करण्यात आले आहे. संस्थेचे माजी विद्यार्थी अमित दीक्षित यांनी दिलेल्या देणगीतून हे पद निर्माण करण्यात आल्याने या पदाला ‘द अमित दीक्षित चेअर’ असे नाव देण्यात आले आहे.

अमित दीक्षित हे आयआयटीच्या स्थापत्य अभियांत्रिकी शाखेचे १९९५ च्या तुकडीचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी रौप्य पदकासह पदवी प्राप्त के ली आहे. सध्या ते ‘ब्लॅकस्टोन’ कं पनीच्या आशिया विभागाचे प्रमुख आहेत. आयआयटीतील महिला प्राध्यापकांना प्रोत्साहन देण्याच्या संस्थेच्या प्रयत्नांना दीक्षित यांनी आजवर पाठिंबा दिला आहे. दीक्षित यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांच्या नावे अध्यासन स्थापन करण्यात आले आहे.

‘विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित या विद्याशाखांमधील आपल्या कार्यामुळे भारताने जगभर प्रतिष्ठा प्राप्त केली आहे. आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. यात महिलांचा सहभाग वाढणे आवश्यक आहे. विविधांगी आणि सर्वसमावेशक मनुष्यबळ उद्योजकतेसाठी पोषक असते. म्हणूनच तंत्रज्ञान क्षेत्रातील महिला नेतृत्व पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल’, असे मत अमित दीक्षित यांनी व्यक्त के ले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 3:00 am

Web Title: women research scholars in mumbai iit women scientists in mumbai iit zws 70
Next Stories
1 मानवाधिकार आयोगाचे कामकाज ठप्प
2 नालेसफाईच्या नावावर सत्ताधाऱ्यांची हातसफाई!
3 ३३ जिल्ह्य़ांमध्ये एसटी सेवा पूर्ववत
Just Now!
X