मुंबई : मानद वन्यजीव रक्षक हे खरे वन्यप्रेमी असून ते जन आणि वन यांना सांधणारा महत्त्वाचा दुवा आहेत. मानव वन्यजीव संघर्ष कमी करून त्यांचे सहजीवन विकसित करण्यासाठी व्यापक जनजागृती करून हा संघर्ष कमी करण्यासाठीच्या उपाययोजना शासनास सुचवाव्यात असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मानद वन्यजीव रक्षकांशी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. राज्यात ‘हेरिटेज ट्री’ संकल्पना राबवल्याबद्दल मानद वन्यजीव रक्षकांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले. राज्यात ३१ जिल्ह्यांत ५५ मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती केल्याची माहिती देऊन वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी यांनी वन, वन्यजीव आणि पर्यावरण रक्षणातील त्यांचे मोलाचे योगदान अधोरेखित केले.