भाषावार प्रांतरचना होऊन मराठी भाषिकबहुल भाग बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर , भालकी यासहित ८६५ गावे अन्यायकारक पद्धतीने कर्नाटकात समाविष्ट केल्याविरोधात सीमाभागात एक नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळला जातो. सीमाभागातील लोकांना पाठिंबा देण्यासाठी आणि सीमाभागातील मराठी भाषकांवरील कर्नाटकच्या अत्याचाराचा निषेध नोंदवण्यासाठी महाराष्ट्र सरकारमधील सर्व कॅबिनेट तसेच राज्यमंत्री १ नोव्हेंबर रोजी ‘काळी’ फित लावून काम करणार आहेत