26 September 2020

News Flash

लोअर परळ कारशेडमध्ये कामगाराचा अपघाती मृत्यू

रेल्वेच्या कामांसाठी नवीन क्रेन बसवताना झालेल्या अपघातात लोअर परळ कारशेडमध्ये शकील अहमद या कामगाराचा बुधवारी दुपारी मृत्यू ओढवला. त्याला तातडीने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

| June 19, 2014 12:01 pm

रेल्वेच्या कामांसाठी नवीन क्रेन बसवताना झालेल्या अपघातात लोअर परळ कारशेडमध्ये शकील अहमद या कामगाराचा बुधवारी दुपारी मृत्यू ओढवला. त्याला तातडीने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. हा कामगार  खासगी कंत्राटदाराचा असल्याने रेल्वे सुरक्षा दलाकडे याबाबत तक्रार नोंदवली गेली नाही. लोअर परळ कारशेडमध्येक्रेन बसवण्याचे काम ‘आयबी-डास्ट’ या कंपनीला देण्यात आले होते. दुपारी १.५०च्या सुमारास ही क्रेन बसवताना क्रेनचा काही भाग शकील अहमदच्या मानेवर कोसळला. त्याला तातडीने नायर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तो मरण पावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2014 12:01 pm

Web Title: worker accidental death in lower parel carshed
Next Stories
1 पुढचा मुख्यमंत्री १०० टक्के शिवसेनेचाच – ‘सामना’तून वचन
2 महायुतीतील पक्षांशी चर्चा करूनच मुख्यमंत्रीपदाचा निर्णय – उद्धव ठाकरे
3 बहुजन समाज पक्षाचा राष्ट्रवादीशी आघाडीस नकार
Just Now!
X