News Flash

भविष्य निधीबाबत सूचना, तक्रारी मांडण्याचे आवाहन

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या प्रादेशिक कार्यालयाकडून २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या काळात दक्षता सप्ताहाचे आयोजन करण्यात

| October 28, 2013 02:44 am

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या प्रादेशिक कार्यालयाकडून २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या काळात दक्षता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात भविष्य निर्वाह निधीचा कोणताही सदस्य तसेच कर्मचारी यांना त्यांच्या तक्रारी व सूचना मांडता येतील.
या सूचना घेण्यासाठी संघटनेच्या वांद्रे पूर्व येथील भविष्य निधी भवनातील तळमजल्यावर यासाठी विशेष सोय केली जाईल. दक्षता सप्ताहात कार्यालयीन वेळेत २६४७६१२९, २६४७०००७ किंवा २६४७५९१० या क्रमांकावर संपर्क साधता येईल. या काळात सूचना, तक्रारी मांडण्याचे आवाहन आयुक्त के. एल. गोयल यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2013 2:44 am

Web Title: workers appeal to suggestions allegations on provident fund
Next Stories
1 कांद्याचे साठेबाज दलाल काँग्रेस-राष्ट्रवादीचे
2 निवृत्तीनंतर घर हिरावून घेऊ नका..
3 २२ जागांसाठी राष्ट्रवादीला आधार कोणता?
Just Now!
X