News Flash

कामगारांची घरे बांगलादेशींना!

* कामगार उपायुक्तांचा प्रताप * ‘सीआयडी’ चौकशीचे आदेश कांदिवलीत कामगारांसाठी बांधलेली घरे बांगलादेशीयांना देण्याचा प्रताप करणाऱ्या कामागार उपायुक्तांची गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष दिलीप

| March 14, 2013 05:34 am

* कामगार उपायुक्तांचा प्रताप
* ‘सीआयडी’ चौकशीचे आदेश
कांदिवलीत कामगारांसाठी बांधलेली घरे बांगलादेशीयांना देण्याचा प्रताप करणाऱ्या कामागार उपायुक्तांची गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी बुधवारी दिले.
कापडबाजार आणि दुकाने मंडळाच्या कामगारांसाठी कांदिवलीत २७ एकर जागेवर घरे बांधण्यात आली आहेत. ही घरे कामगारांसाठी अथवा त्यांच्या वारसदारांसाठी असतानाही तत्कालिन कामगार उपायुक्त वाय. बी. निकम यांनी निवृतीच्या दोन दिवस अगोदर ३०० घरांचे बेकायदेशीर हस्तांतरण करून त्यातील अनेक
घरे बांगलादेशीयांना दिल्याची बाब विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे
यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणली.  
त्यावर कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी कामगार उपायुक्तांनी केलेल्या घोटाळ्याची कबुली दिली. तसेच घरे हस्तांतरणाचा हा निर्णय रद्द करून उपायुक्तांची खातेनिहाय चौकशी करण्याची घोषणाही त्यांनी केली. त्यावर हे प्रकरण गंभीर असून संपूर्ण प्रकरणाची गुन्हे शाखेतर्फे चौकशी करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2013 5:34 am

Web Title: workers room to bangladesh peoples
Next Stories
1 बेरोजगारांच्या संस्था भ्रष्टाचाराचे कुरण! – वळसे पाटील
2 आणखी एक १५ डब्याची गाडी
3 अमराठी नगरसेवकांचा मराठीचा वर्ग भरलाच नाही
Just Now!
X