आज जागतिक पर्यावरण दिन असून त्यानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पर्यावरण रक्षणासंदर्भात एक महत्वाचा संदेश दिला आहे. पर्यावरणाबाबत नेहमीच जागरुक असणाऱ्या राज ठाकरे यांनी मराठी आणि इंग्रजीमध्ये टि्वट करताना एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला आहे.

चार वर्षांपूर्वी २०१४ साली राज ठाकरेंनी माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात महाराष्ट्राच्या विकास आराखड्याची ब्ल्यू प्रिंट सादर केली होती. त्यावेळी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काय करावे लागेल याची माहिती देणारा एक व्हिडिओ तयार केला होता. तो व्हिडिओ राज यांनी पोस्ट केला आहे.

आपलं शहर,गाव,नद्या,रस्ते,जंगलं,विहिरी ह्या आपल्या मानून जर त्यांची नीट निगा राखली तरच भवताल सुंदर होईल आणि पर्यावरण दिन खऱ्या अर्थाने साजरा होईल. हीच भूमिका मी २०१४ ला विकास आराखडा सादर करताना एका चित्रफितीद्वारे मांडली होती असे राज यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

काही महिन्यांपूर्वी मनसेने मेट्रो-३ प्रकल्पासाठी गोरेगाव आरे कॉलनीमधल्या प्रस्तावित कारशेडला विरोध केला होता. या कारशेड उभारणीमुळे वनसंपदेचे नुकसान होणार आहे. त्यामुळे या कारशेडला मनसेचा प्रखर विरोध आहे.