जागतिक पर्यावरण दिवस २०१८ चे औचित्य साधून भामला फाऊंडेशनच्या कार्यक्रमातून प्लास्टिकचा वापर न करण्याचा आणि पृथ्वीला प्लॅस्टिकपासून वाचविण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी भामला फाऊंडेशनकडून मुंबई शहरात ५०० झाडे लावण्यासाठी एक वृक्षारोपण अभियानही आयोजित करण्यात आले होते. या मोहिमेचा उद्देश म्हणजे प्लास्टिक बहिष्कार, झाडांचे संरक्षण आणि वृक्षारोपणबद्दल जागरुकता वाढवणे होते. यावर्षी प्लॅस्टीकचा वापर कमी करण्यासाठी विशेष विनंती करण्यात आली होती.

आदित्य ठाकरे, सिद्धांत कपूर, शामक दावर, अरमान आणि अयान मलिक, गायक शान, तनीषा मुखर्जी यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. संयुक्त राष्ट्रसंघाच्या १९७२ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या या जागतिक पर्यावरण दिवसाला एक सकारात्मकता देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमावेळी बोलताना पोद्दार डायमंड लिमिटेड संचालक मोनिका पोद्दार म्हणाल्या की, “आम्ही पोद्दार डायमंड्स लिमिटेडमध्ये प्लॅस्टिकचा वापर कमी केला आहे. भामला फाऊंडेशनसारख्या संस्थांच्या प्रयत्नांमुळे पर्यावरणाची आमची प्रतिबद्धता आणखी मजबूत होत आहे.”

संयुक्त राष्ट्रानुसार, प्लॅस्टिक कचऱ्यापैकी १२ दशलक्ष टन प्लॅस्टिक दरवर्षी पाण्यामध्ये टाकले जाते. मायक्रोस्कोपिक प्लॅस्टिक कणांनी आमच्या अन्न वाढवण्यासाठी वापरली जाणारी माती दूषित झाली आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या १२ हजारांहून अधिक लोकांनी प्लॅस्टिक्स सोडण्याचे आश्वासन दिले. पर्यावरणीय संरक्षणातील त्याच्या भूमिकेसाठी स्थानिक संघटनांचा सन्मानदेखील करण्यात आला.