महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य सरकारचा पर्यावरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ७ जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येणार आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री रामदास कदम, राज्यमंत्री, प्रविण पोटे पाटील, मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय उपस्थित रहाणार आहेत. पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव सतिश गवई व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ.पी.अन्बलगन या सोहळयाचे निमंत्रक आहेत.
कार्यक्रमाला राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, औद्योगिक आस्थापनातील मोठे उद्योग व लघु उद्योग, सीईटीपी यांच्यासाठी घेण्यात आलेल्या वसुंधरा पुरस्कार २०१६ या स्पध्रेचे पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. तसेच, राज्यातील पर्यावरण क्षेत्रात लघुचित्रपटाद्वारे कार्यरत असणाऱ्या हौशी व व्यावसायीक लघुचित्रपट निर्माते व दिग्दर्शक यांच्यासाठी घेण्यात आलेल्या वसुंधरा लघुचित्रपट आणि फोटोच्या माध्यमातून पर्यावरणाचा प्रश्न अधोरेखित करणारी हौशी व व्यावसायिक गटातील अभिनव फोटोथॉन स्पर्धा,२०१६ या स्पर्धाचे पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व मुंबई दूरदर्शन यांच्या संयुक्त विद्यमाने वसुंधरा लघुचित्रपट स्पर्धा, २०१६ याची घोषणा, सृष्टी मित्र पुरस्कारांचे वितरण आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, वनराई, पुणे व झी २४ तास यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील दुष्काळग्रस्त गावात जनसंवर्धन, बचत, नियोजन व व्यवस्थापन याकरीता जल संवर्धन पंचायत एक लोकचळवळ या उपक्रमाचा शुभारंभ अशा विविध कार्यक्रमाने हा सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळयाला पर्यावरण प्रेमींनी हजेरी लावावी असे आवाहन या सोहळयाचे संयोजक संजय भुस्कुटे यांनी केले आहे. या सोहळयाचे प्रक्षेपण मुंबई दूरदर्शनच्या सहयाद्री वाहिनीवरुन ८ जून, २०१६ रोजी सायंकाळी ७.३० ते ८.३० वाजता प्रक्षेपित केले जाणार आहे.

mumbai high court on sawantwadi dodamarg wildlife corridor
विश्लेषण : सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील? न्यायालयाचा आदेश काय? होणार काय?  
Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
The forts in the state are in the grip of private encroachments Pune
राज्यातील किल्ले खासगी अतिक्रमणांच्या विळख्यात… आता होणार काय?
Border march canceled in Ladakh Determined to continue peaceful protests
लडाखमधील ‘सीमा मोर्चा’ रद्द; शांततापूर्ण निदर्शने सुरू ठेवण्याचा निर्धार