जगातील पहिले ‘द रोलिंग पेंटिंग’ जहांगीर कलादालनात; प्रेक्षकांसाठी २२ फेब्रुवारीपर्यंत खुले

मुंबई : राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विक्रमांची नोंद असलेले ‘द रोलिंग पेंटिंग’ प्रथमच कलारसिकांना पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. एकाच चित्रात बारा दृश्यांचे दर्शन घडविणारी ही कलाकृती कोलकात्याच्या बिभूती अधिकारी यांनी साकारली आहे. काळा घोडा येथील जहांगीर कलादालनात २२ फे ब्रुवापर्यंत ही कलाकृती पाहता येणार आहे.

‘फे थ अ‍ॅण्ड फ्युरी अन्विलिंग द एक्सेंट्रीक’ या शीर्षकांतर्गत बिभूती यांच्या ३५ चित्रांचे प्रदर्शन जहांगीरमध्ये भरवण्यात आले आहे. यासह जगातील पहिले ‘द रोलिंग पेंटिंग’ ही ठेवण्यात आले आहे. पीव्हीसी पाइप्सच्या ५९४ तुकडय़ांचा वापर करून ‘निसर्ग आणि प्राण्यांचे संवर्धन’ या विषयावर आधारित ५ बाय ४ फूट उंचीची ही कलाकृती साकारली आहे. पीव्हीसी पाइपला कॅ नव्हासचे आवरण लावून त्यावर रंगकाम करण्यात आले. या चित्रात काही हरणे, काही मोर, वाघ आणि इतर पक्षी आहेत. एके क पाइप वर्तुळाकार दिशेत फिरवल्यानंतर चित्रातील प्राणी-पक्ष्यांची स्थिती, जागा, संख्या बदलते. यातून वेगवेगळी १२ दृश्ये पाहायला मिळतात.

‘द रोलिंग पेंटींग’साठी बिभूती यांना ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’द्वारे पुरस्कार मिळाला आहे. तसेच त्यांना डिसेंबर २०१९मध्ये ‘वल्र्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटी’द्वारे डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.

जहांगीरमधील प्रदर्शनात बिभूती यांनी ‘लॉकडाऊन बाबा’ हे चित्रही साकारले आहे. खालच्या दिशेने फिरलेले टाळे आणि त्यावर निसर्गात झालेला सकारात्मक बदल दाखवणारा हिरवा रंग टाळेबंदीचा समाजावर झालेला परिणाम

दर्शवतो. समाजावर नियंत्रण ठेवणाऱ्या साधूंच्या वस्त्राचा भगवा रंग वापरून टाळेबंदीने समाजावर नियंत्रण कसे ठेवले, हे दाखवण्यात आले आहे.