News Flash

याला म्हणतात वर्क फ्रॉम होम… वरळीच्या घरातूनच थेट समुद्रात मासेमारी

कोळी बांधवानं यासाठी अनोखी शक्कल लढवली.

सध्या देशात करोनानं थैमान घातलं आहे. त्यातच देशात करोनाग्रस्तांची संख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. महाराष्ट्राही करोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. त्यात मुंबईत सर्वाधिक करोनाग्रस्त सापडले आहेत. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील वरळी हा भाग सील करण्यात आला आहे. त्याचा फटका कोळी बांधवांनाही बसत आहे. अशा परिस्थितीत त्यांना मासेमारीसाठी जाणं शक्य होतं नाही. परंतु वरळीत राहणाऱ्या एका कोळी बांधवानं मात्र यासाठी एक अनोखी शकल्ल लढवली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेकांना वर्क फ्रॉम होम देण्यात आलं आहे. अशातच एका कोळी बांधवानं मात्र वर्क फ्रॉम होमची अनोखी शक्कल लढवली आहे. एका कोळी बांधवाचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. समुद्राला भरती आल्यानंतर काटा टाकून मासेमारी करण्याची अनोखी शक्कल त्यांनी लढवली आहे. समुद्र किनारी घर असल्यामुळे अशी शक्कल लढवत मासेमारी केल्याचं सांगण्यात आलं आहे.

वरळी प्रभादेवी परिसरात संख्या वाढली
वरळी-प्रभादेवी परिसरातील रुग्णांचा वाढता आकडा आणि संभाव्य संसर्ग लक्षात घेऊन वरळीच्या सरदार वल्लभभाई स्टेडियममध्ये ५०० खाटांचा विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. वरळी परिसरातील रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत असल्यामुळे पालिकेचा आरोग्य विभाग चिंतेत आहे. वरळी कोळीवाडा, जिजामाता नगर यांसारख्या दाटीवाटीने पसरलेल्या भागात संशयित रुग्णांना घरात अलग करून ठेवणे अशक्य असल्यामुळे तिथे संसर्ग वाढतच होता. त्यामुळे पालिकेने अशा संशयित रुग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी आधी पोद्दार रुग्णालयात व्यवस्था केली होती. त्यानंतर आता वरळीच्या ‘नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया’च्या ‘सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम’मध्ये सुसज्ज विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2020 10:04 pm

Web Title: worli mumbai fishermen fishing from his sea facing house coronavirus lockdown jud 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मुंबईत २४ तासात ११ मृत्यू, १८९ करोना पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ११८२
2 धक्कादायक, एकटया मुंबईत Covid-19 चे ६१ टक्के रुग्ण
3 धारावीत करोना स्क्रिनिंगला सुरुवात, १५० डॉक्टर्स कार्यरत
Just Now!
X