News Flash

बेळगावात घरातून जप्त केली कोट्यवधींची सांबराची शिंगे, हत्तीचे सुळे

या प्रकरणी सलीम चमडेवाले नावाच्या तस्कराला अटक करण्यात आली आहे.

सांबराच्या शिंगाचे संग्रहित छायाचित्र.

बेळगावमधून कोट्यवधी किमतीची सांबराची शिंगे, हत्तीचे सुळे आणि वाघनखे जप्त करण्यात आली आहेत. येथील शेट्टी गल्लीतील एका घरावर धाड टाकून पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. पोलीस तपास सुरू आहे.
सलीम चमडेवाले असे अटक केलेल्या तस्कराचे नाव आहे. विशेष म्हणजे ज्या घरातून हे सर्व साहित्य जप्त करण्यात आलं, त्या घरात भूत असल्याची अफवा पसरवण्यात आली होती. त्यामुळे घरात कोणीही जात नव्हतं. तसंच घरात लाईट नसल्यानं रात्रीच्या वेळी नेमकं काय चालतं हे कोणालाही समजत नव्हतं.
सलीम आपल्या कारमधून प्राण्यांची शिंगे आणि इतर वस्तू आणायचा आणि घरात ठेवायचा. यानंतर कारमधून हा सर्व माल मुंबईला जायचा तिथून चीनमध्ये पाठवला जात असे, अशी माहिती आहे.
दरम्यान या सर्व वस्तूंचे मूल्यमापन करण्यासाठी पोलिसांनी वनखात्याशी संपर्क साधला आला असून यामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 12:54 pm

Web Title: worth millions of animal organs sized in belgaum city one arrested
Next Stories
1 छोट्या दलालांना पाठवून हल्ला काय करता; किरीट सोमय्यांचे शिवसेनेला आव्हान
2 भुजबळांना जे. जे. रुग्णालयातून डिस्चार्ज, पुन्हा तुरुंगात रवानगी
3 पालिका निवडणुकीत ‘मराठा कार्ड’ची हवा
Just Now!
X