मुंबई: दहशतवादविरोधी संघर्षांत २०१९-२० या वर्षांत जखमी झालेल्या जवानांना आणि युद्धात शहीद झालेल्या आठ वीरांच्या पत्नींना प्रजासत्ताकदिनी सकाळी १० वाजता किंग्ज सर्कल येथील सभा हॉलमध्ये मानवंदना दिली जाणार आहे. याशिवाय लेफ्टनंट जनरल एस. के. प्रशार, जीओसी (महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्र) यांच्या हस्ते शकिला शौकत अली यांना ‘श्री षण्मुखानंद शौर्यरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. शकिला शौकत अली यांचे संपूर्ण कुटुंब- पती नाईक शौकत अली, मुलगे मेजर जावेद खान आणि लेफ्टनंट जाफर खान सन्यात कामी आले.

भारतीय सन्य आणि षण्मुखानंद सभा यांच्यातर्फे संयुक्तपणे युद्धात अपंगत्व आलेल्या सनिकांचा प्रजासत्ताकदिनी आणि युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांचा दरवर्षी स्वातंत्र्यदिनी गौरव केला जातो. यंदा टाळेबंदीमुळे १५ ऑगस्टचा कार्यक्रम होऊ शकला नाही. त्यामुळे या वर्षी दोन्ही कार्यक्रम संयुक्तपणे घेण्यात येतील, अशी माहिती सभेचे अध्यक्ष डॉ. व्ही. शंकर यांनी दिली.

जखमी योद्धय़ांना एक लाख रुपयांची थली आणि स्मृतिचिन्ह देण्यात येणार असून शहिदांच्या कुटुंबाला प्रत्येकी दोन लाख रुपयांची थली आणि स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.