20 February 2019

News Flash

‘आपले भुवन आपले नाविक’ अग्रलेखावर व्यक्त व्हा

आजही देशात शेकडो प्रयोग हे प्रत्यक्ष चाचणीवाचून प्रयोगशाळेतच पडून आहेत.

आपल्या देशात काय होते यापेक्षा परदेशात काय झाले आणि तेथून आपल्यासाठी जी सुविधा आली तीच योग्य अशी मानसिकता भारतीयांमध्ये आढळते. त्यामुळे, भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्त्रो’ने नुकतीच ‘ग्लोबल पोझीशनिंग प्रणाली’ (जीपीएस) तयार केली याचे महत्त्व भारतीयांना पटणार नाही. देशात होणाऱ्या संशोधनाबाबत कायम अनास्था दाखवणाऱ्या भारतीयांच्या या वृत्तीचा समाचार आपले ‘भुवन’ आपले ‘नाविक’ या अग्रलेखात घेण्यात आला आहे. या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

मूलभूत विज्ञानापेक्षा उपयोजित विज्ञानाचाच उदोउदो करण्याची एक अज्ञानजन्य संस्कृती आजच्या ‘वापरा आणि फेकून द्या’च्या काळात फोफावली आहे. आजही देशात शेकडो प्रयोग हे प्रत्यक्ष चाचणीवाचून प्रयोगशाळेतच पडून आहेत. हे प्रयोग यशस्वी झाले तर आपणही अनेक समस्यांना तोंड देऊ शकू. मात्र, घरची कोंबडी डाळीसारखीच या वृत्तीमुळे कोणतीही समस्य उभी ठाकली की आपले तोंड परदेशांकडे वळते. त्यामुळेच भारतीयांना ‘भुवन’ या देशी नकाशा प्रणालीचे व नुकत्याच अंतराळात सोडलेल्या ‘नाविक’ उपग्रहाचे महत्त्व कळत नाही. भारतीयांच्या याच वृत्तीवर या अग्रलेखात निशाणा साधण्यात आला आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ‘ब्लॉग बेंचसर्’मध्ये आपली भूमिका मांडायची आहे. पुढच्या गुरूवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या www.loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील.

या विषयावर ‘लोकसत्ता’ने वरळी येथील ‘नेहरू तारांगण’चे संचालक अरविंद परांजपे व ‘आयआयटी’मधील प्राध्यापक दिपक फाटक यांना बोलते केले आहे. त्यांच्या मतांचा विद्यार्थ्यांना आपले मत मांडतना उपयोग होणार आहे.

लक्षात ठेवावे असे..

  • प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते.
  • मते नोंदविण्यासाठी  पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत.
  • www.loksatta.com/Blogbenchers या संकेतस्थळावर स्पर्धेतील सहभागासंबंधी माहिती उपलब्ध.
  • ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते.
  • नोंदणीनंतर विद्यार्थ्यांsना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. त्याच्याआधारे लॉगइन करून विद्यार्थ्यांना भूमीका मांडता येते.
  • किमान २५० शब्द व मराठीतील लेखनाचाच स्पर्धेसाठी विचार केला जाईल. सहभागी होताना अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.

First Published on May 6, 2016 2:31 am

Web Title: write opinion on loksatta agralekh through loksatta blog benchers