मुंबई विद्यापीठातील बी.कॉमच्या विद्यार्थ्यांच्या आठ गुणांचा प्रश्न

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा गोंधळी कारभार सुरूच असून सोमवारी पार पडलेल्या बी. कॉमच्या तृतीय वर्षांच्या अकाऊंटिंग अँड फायनान्सच्या प्रश्नपत्रिकेत चुकीची एण्ट्री देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला असून त्यांच्या आठ गुणांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षांची परीक्षा २२ एप्रिलपासून सुरू झाली आहे. परीक्षेच्या पहिल्या प्रश्नपत्रिकेतही विद्यार्थ्यांना चुका जाणवल्या. सोमवारी पार पडलेल्या दुसऱ्या दिवशीच्या परीक्षेतही प्रश्नपत्रिकेत प्रश्नांमध्ये चुकीचे नाव देण्यात आले होते. याबाबत विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर विचारले असता काही केंद्रांवर चुका दुरुस्त करून देण्यात आल्या तर काही ठिकाणी करून देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आठ गुणांचा फटका बसणार का अशी भीती व्यक्त होत आहे. याबाबत विद्यापीप्रतिनिधी, मुंबईठाशी संपर्क साधला असता असा कोणताही प्रकार घडला नसून आमच्याकडे एकही तक्रार आली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. जर प्रश्नपत्रिकेतील चुकीमुळे विद्यार्थ्यांची उत्तरे चुकली असतील तर या प्रकाराची चौकशी करून विद्यार्थ्यांना त्यांचे गुण देण्यात येतील, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले.