04 June 2020

News Flash

बारावीची पुस्तके संकेतस्थळावर

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निगचाही पर्याय

संग्रहित छायाचित्र

 

टाळेबंदीमुळे बालभारतीने बारावीची नव्या अभ्यासक्रमाची पुस्तके ‘पीडीएफ’ स्वरूपात संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ई-साहित्यही उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करत आहे.

राज्यमंडळाचा बारावीचा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षांपासून (२०२०-२१) बदलणार आहे. नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी नवी पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध होतात. यंदाही बालभारतीने मार्चअखेरीस बारावीची सर्व पुस्तके दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले. मात्र, टाळेबंदी न हटल्यास विद्यार्थ्यांना दुकानांमध्ये पुस्तके उपलब्ध होणे शक्य नाही. त्यामुळे आता बारावीची पुस्तके बालभारतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा विचार शिक्षण विभाग करत आहे. पहिली ते अकरावीचा अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने गेल्यावर्षीपर्यंत बदलण्यात आला. या अभ्यासक्रमाची पुस्तके संकेतस्थळावर पूर्वीपासूनच उपलब्ध आहेत.

त्याचबरोबर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ई-साहित्य उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत.

टाळेबंदी न हटल्यास पुढील शैक्षणिक वर्षांचे वेळापत्रक कोलमडणार आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास सुरू करता यावा, यासाठी विविध पर्यायांची पडताळणी विभाग करत आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. टाळेबंदीबाबत पुढील निर्णय झाल्यानंतर आगामी दिशा ठरवणे शक्य होईल. मात्र, विविध शक्यतांचा विचार करून पर्याय शोधण्यात येत आहेत. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास एप्रिलपासूनच सुरू होतो. यंदा आधीच बारावीची नव्या अभ्यासक्रमाची पुस्तके वितरणापूर्वी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

– वर्षां गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2020 12:44 am

Web Title: xii books on the website abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 Coronavirus: पुण्यात संचारबंदीची होणार कडक अंमलबजावणी; दोनच तास राहणार दुकानं खुली
2 VIDEO: भुकेलेल्या कुटुंबासाठी पोलीसच झाले देवदूत
3 Coronavirus: गुटखा खाऊन थुंकणाऱ्या भाजपा नगरसेवकाला पोलिसांनी दिला चोप
Just Now!
X