05 March 2021

News Flash

जुन्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री शकिला यांचे निधन

'आर पार' चित्रपटातील त्यांचे 'बाबुजी धीरे चलना' गाणे ५०च्या दशकात खूप प्रसिद्ध झाले.

ज्येष्ठ अभिनेत्री शकिला

ज्येष्ठ अभिनेत्री शकिला यांचे काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या. ‘मुंबई मिरर’ वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, शकिला यांना तात्काळ वांद्रे येथील रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, तेथे बेड उपलब्ध नसल्यामुळे त्यांना जुहू येथील आरोग्य निधी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

१९५०-६० च्या दशकात बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेले अभिनेते गुरुदत्त यांच्या ‘सीआयडी’ आणि ‘आरपार’ या चित्रपटांमुळे शकिला प्रसिद्धीच्या झोतात आल्या. ‘अलिबाबा और ४० चोर’, ‘हातिम ताई’, ‘आर पार’, ‘श्रीमान सत्यवादी’, ‘चायना टाउन’ यासारख्या ५० चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. ‘आर पार’ चित्रपटातील त्यांचे ‘बाबुजी धीरे चलना’ गाणे ५०च्या दशकात खूप प्रसिद्ध झाले. आजही हे गाणे अनेकांच्या प्लेलिस्टचा भाग असल्याचे पाहायला मिळते. १९६३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उस्तादो के उस्ताद’ या चित्रपटात त्या शेवटच्या झळकल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 10:20 am

Web Title: yesteryear actress shakeela insha passes away
Next Stories
1 चिखलात रूतलेलं विमान बाहेर काढण्यात यश; मुंबई विमानतळावरील सर्व उड्डाणे सुरू
2 मुंबईत लवकरच रात्रीचा ‘दिवस’?
3 निवासी डॉक्टरांना डेंग्यूची लागण
Just Now!
X