News Flash

असंसदीय शब्दाबद्दल योगेश सोमण यांची माफी

मुंबई विद्यापीठाच्या नाटय़शास्त्र विभागात पुन्हा रूजू

संग्रहित छायाचित्र

मुंबई विद्यापीठाच्या नाटय़शास्त्र विभागाचे प्रमुख योगेश सोमण यांच्याविरोधात विद्यार्थ्यांनी जानेवारीत के लेल्या आंदोलनानंतर सोमण यांना तात्काळ रजेवर पाठवण्यात आले होते. विद्यार्थ्यांसमोर वापरलेल्या असंसदीय शब्दाबद्दल माफी मागत सोमण पुन्हा एकदा विभाग प्रमुख म्हणून रुजू झाले आहेत. मात्र, नाटय़शास्त्राचा अभ्यासक्रम बदलण्याची गरज असल्याच्या मतावर ते अजूनही ठाम आहेत.

गेल्या आठवडय़ात झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत सोमण उपस्थित राहिल्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांमध्ये रोष उफाळून आला आहे. त्याविरोधात विद्यार्थ्यांनी रविवारी कु लगुरू सुहास पेडणेकर यांना एसएमएस पाठवून निषेध नोंदवला. मात्र, ‘चौकशी समितीने मला निर्दोष ठरवले आहे. नाटय़शास्त्राच्या अभ्यासक्रमाबाबत बोलताना मी विद्यार्थ्यांसमोर असंसदीय शब्द वापरला. तो संवाद माझ्या नकळत ध्वनीमुद्रीत करून विनाकारण गैरसमज पसरवला गेला. त्या शब्दाबद्दल मी जाहीरपणे माफी मागितली आहे. चौकशी समितीत हा मुद्दा आला होता’, असे सोमण यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 12:10 am

Web Title: yogesh soman apologizes for unparliamentary words abn 97
Next Stories
1 मुंबईत जास्त चाचण्या होऊनही दाखल होणाऱ्या करोना रुग्णांचे प्रमाण कमी!
2 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली महत्त्वाची बैठक, विद्यापीठ अंतिम परीक्षांसंदर्भात निर्णयाची शक्यता
3 मुंबई व कोकणात उद्या मुसळधार, हवामान खात्याचा इशारा
Just Now!
X