सौंदर्यस्पर्धा वा फॅशन शोकरिता अनेक मॉडेल बोटॉक्स उपचार करून घेतात.  पण आता मात्र साध्या पार्टीला किंवा लग्नाला जाण्यासाठी अशा उपचारांना तरुणी प्राधान्य देत आहेत. स्वतच्या लग्नासाठी कित्येक उच्चभ्रू कुटुंबातील तरुणी आणि त्यांच्या आयाही काही खास बोटॉक्स उपचार करून घेतात, असे सुप्रसिद्ध सौंदर्यतज्ञ डॉ. जमुना पै यांनी सांगितले.
बोटॉक्स शस्त्रक्रियेचा खर्च साधारणपणे सहा ते २० हजारांपर्यंत असतो, पण त्याचा परिणाम केवळ तीन-चार माहिनेच राहतो.  सध्या भारतात लिपोसक्शन शस्त्रक्रियेला जास्त मागणी असून अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठीचा खर्च सुमारे ५० हजार दोन लाखांपर्यंत असतो.
सध्या तरुणींना तात्काळ परिणाम हवे असतात. त्यासाठी परिश्रम घ्यायचे नसतात. नामवंत सेलेब्रिटी वा चित्रतारकांसारखे दिसण्याची अनेकींची धडपड असते. त्यासाठी त्या या शस्त्रक्रियांच्या आहारी जातात, असे मानसोपचारतजज्ज्ञ डॉ. वैशाली देशमुख यांनी सांगितले.
बोटॉक्ससारख्या उपचारांच्या अतिवापराने चेहरा निर्विकार होतो. कित्येकदा कॉस्मेटिक शस्त्रक्रिया फसतातसुद्धा. तसे झाल्यास ती तरुणी नैराश्याने ग्रासली जाण्याचीही शक्यता असते, असा धोक्याचा इशाराही त्यांनी दिला.
सौंदर्य शस्त्रक्रिया आणि त्यांचा अंदाजे खर्च  
*लिपोसक्शन (शरीरातील अतिरिक्त चरबी काढणे) :  २५,००० – १,२५,००० रु.
*थाय लिफ्ट सर्जरी (मांडय़ांमधील चरबी काढणे) :  ६०,००० – २,००,००० रु.
*आर्म लिफ्ट सर्जरी (हाताला कमनीयता देणे) : ५०,००० – ८०,००० रु.
*बेली बटन रिशेपिंग (बेंबीचा आकार बदलणे) : ४०,००० – ५०,००० रु.
*टमी टक (पोटाचा घेर कमी करणे) : ८०,००० – १,००,००० रु.
*सिंड्रेला प्रोसिजर (पायांच्या तळव्यांचा आकार बदलणे) – २,००,००० रुपयांपर्यंत