News Flash

अशोका युनिव्‍हर्सिटीचा प्रतिष्ठित ‘यंग इंडिया फेलोशिप’ कोर्ससाठी प्रवेश सुरू

वेशाच्‍या दुस-या टप्‍प्‍याची अंतिम मुदत २ फेब्रुवारी २०२० आहे.

अशोका युनिव्‍हर्सिटीचा प्रमुख एक-वर्षाचा मल्‍टी-डिसीप्‍लीनरी निवासी पदव्‍युत्‍तर डिप्‍लोमा कोर्स ‘यंग इंडिया फेलोशिप’च्‍या अध्‍ययन अभ्‍यासक्रमाच्‍या दहाव्‍या बॅचसाठी प्रवेशाचा दुसरा टप्‍पा सुरू झाला आहे. प्रवेशाच्‍या दुस-या टप्‍प्‍याची अंतिम मुदत २ फेब्रुवारी २०२० आहे. या कोर्ससाठी अर्ज करण्‍याचा तिसरा व अंतिम टप्‍पा ३ फेब्रुवारी २०२० रोजी सुरू होऊन ३१ मार्च २०२० रोजी बंद होईल.

पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया

कोणत्‍याही शाखेमधील मान्‍यताप्राप्‍त पदवीधर किंवा पदव्‍युत्तर पदवी असलेले (अंतिम वर्षात शिकत असललेल देखील) आणि १५ जुलै २०२० रोजी २८ वर्षांपेक्षा अधिक वय नसलेले उमेदवार अर्ज करण्‍यासाठी पात्र आहेत. कामाचा अनुभव असलेले उमेदवार देखील पात्र आहेत. अर्जाचे सखोल मूल्‍यांकन, टेलिफोनिक मुलाखत आणि लेखी आकलन चाचणी व मुलाखतीच्‍या अंतिम फेरीनंतर मूल्‍यमापन करण्‍यात येते. अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्‍यासाठी काहीसा अवधी लागतो. बहुतांश वेळ निबंध लिहिण्‍यामध्‍ये जातो. यामध्‍ये उमेदवारांना त्‍यांच्‍यासाठी महत्त्‍वाच्‍या असलेल्‍या गोष्‍टी, त्‍यांचा वैयक्तिक प्रवास आणि त्‍यांना वायआयएफकडून काय अपेक्षा आहेत यासंदर्भात लिहिण्‍यास सांगितले जाते.

वायआयएफ आर्थिक साह्य आणि अर्ज शुल्‍क

अशोका युनिव्‍हर्सिटी भारतीय उच्‍च शिक्षणामधील अनपेक्षित उपक्रम सामूहिक परोपकारी व संघटित शासन मॉडेलसाठी ओळखली जाते. वायआयएफ विद्यार्थ्‍यांना गरजेनुसार १०० टक्‍के आर्थिक साह्य करते आणि कोर्ससाठी अर्ज करण्‍यासाठी कोणतेच शुल्‍क आकारले जात नाही. सध्‍याच्‍या वायआयएफ विद्यार्थीवर्गापैकी दोन-तृतीयांश विद्यार्थ्‍यांना काही स्‍वरूपात आर्थिक साह्य करण्‍यात आले आहे. जवळपास ३० टक्‍के विद्यार्थ्‍यांना १०० टक्‍के शिक्षण शुल्‍क माफ करण्‍यात आले आहे.

अधिक माहितीसाठी www.youngindiafellowship.com  येथे भेट द्या आणि ऑनलाइन अर्ज करण्‍यासाठी www.apply.ashoka.edu.in येथे भेट द्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2020 7:31 pm

Web Title: young india fellowship ashoka university mppg 94
Next Stories
1 मुंबईत टॅक्सींवर आता तीन रंगांचे दिवे लागणार; १ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी
2 शरद पवारांना जाणता राजा म्हटलेलं कसं चालतं ? सुधीर मुनगंटीवार यांचा सवाल
3 धक्कादायक! मावशीवरील बलात्काराच्या व्हिडीओची भीती दाखवत अल्पवयीन भाचीवर बलात्कार
Just Now!
X