दुर्धर आजाराला कंटाळून २० वर्षीय तरुणाने बुधवारी केईएम रुग्णालयात गळफास घेत आत्महत्या केली. शहाजी खरात असे या तरुणाचे नाव असून तो चेंबूर येथे वास्तव्यास होता. २३ जूनला खासगी रुग्णालयातून शहाजी याला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कक्ष क्रमांक २० येथे उपचार सुरू असताना शहाजी याने इतरांची नजर चुकवत खिडक्यांच्या लोंखंडी गजाला गळफास घेतला. कर्करोगाचे निदान झाल्यापासून शहाजी निराश होता, अशी माहिती कुटुंबाने जबाबात दिल्याचे भोईवाडा पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेतली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 10, 2020 12:36 am