21 January 2021

News Flash

इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू

स्थानिकांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली.

प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई : मालवणी येथील न्यू महाकाली भागात बांधकाम सुरू असलेल्या ‘एसआरए’च्या इमारतीवरून पडून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. राजू विश्वकर्मा असे तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

राजू हा मालवणीतील बुद्धनगर परिसरात राहत होता. त्याच्या वडिलांचा भंगाराचा व्यवसाय असून त्यांच्याबरोबरच तो काम करीत होता. शुक्रवारी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून राजू खाली कोसळला. आवाज आल्याने स्थानिकांनी या इमारतीजवळ जाऊन पाहणी केली असता राजू बेशुद्धावस्थेत आढळून आला. स्थानिकांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली.

राजूला भूमीपार्क नजीकच्या सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास मालवणी पोलीस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2020 12:04 am

Web Title: young man dies after falling from building zws 70
Next Stories
1 महिलेची आत्महत्या
2 “अ‍ॅमेझॉनला धडा शिकवला…”; मनसे नेत्याने केलं ट्विट
3 भाजपाच्या आशिष शेलारांनी केलं उद्धव ठाकरेंच्या मुलाचं तोंडभरून कौतुक, म्हणाले…
Just Now!
X