News Flash

विवाहितेची हत्या

जेवणात मीठ कमी पडल्याने पत्नीची रस्त्यात हत्या

संग्रहित छायाचित्र

जेवणात मीठ कमी पडल्याने तरुणाने पत्नीची रस्त्यात हत्या केली. हा प्रकार शुक्रवारी रात्री भेंडीबाजार परिसरात, मोहम्मद अली मार्गावर घडला.

अब्दुल रेहमान शेख असे आरोपीचे नाव असून तो पत्नी नुसरतबरोबर भेंडीबाजार परिसरात वास्तव्यास होता. मिठावरून अब्दुलने वाद घातला आणि नुसरतला मारहाण सुरू केली. तावडीतून निसटलेल्या नुसरतचा अब्दुलने पाठलाग केला. पुन्हा पकडून अब्दुलने तिचे कपाळ रस्त्यावरील उंच दुभाजकावर आपटले. त्यात नुसरतचा जागीच मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2020 1:06 am

Web Title: young man kills wife on street due to lack of salt in meal abn 97
Next Stories
1 तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांचे नवे सत्र नोव्हेंबरपासून 
2 तीन हजार रुग्णांना मदत करणारा योद्धा करोनामुक्त
3 परीक्षण समितीअभावी २०० चित्रपट अनुदानाविना
Just Now!
X