News Flash

प्रेयसीवरून वाद; लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या

'व्हॅलेन्टाइन डे'च्या दिवशीच प्रेयसीवरील वादावरून मुंबईच्या दादर परिसरात सख्या मोठ्या भावाला आपला जीव गमवावा लागल्यामुळे या परिसरात खळबळ माजली आहे.

| February 14, 2014 04:09 am

‘व्हॅलेन्टाइन डे’च्या दिवशीच प्रेयसीवरील वादावरून मुंबईच्या दादर परिसरात सख्या मोठ्या भावाला आपला जीव गमवावा लागल्यामुळे या परिसरात खळबळ माजली आहे. जीतूराज गोस्वामी (४० वर्षे) आणि नवीन गोस्वामी (२१ वर्षे) हे दोघे सख्खे भाऊ रानडे रोडवर आईस्क्रिम पार्लर चालवतात. काल (गुरूवार) रात्री अकरा वाजताच्या सुमारास जीतूराज आणि नवीन यांच्यात झालेल्या भांडणामध्ये जीतूराजने नवीनच्या प्रेयसीला शिव्या दिल्या. त्यानंतर संतप्त झालेल्या नवीनने आईसक्रीम कापण्याच्या चाकूने आपला मोठा भाऊ जीतूराजची हत्या केली. त्यानंतर शिवाजी पार्क पोलीसांनी नवीनला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2014 4:09 am

Web Title: younger brother killed elder brother in dadar
टॅग : Valentine Day
Next Stories
1 ‘टोल भरू नका’ स्टिकर्स लावणारे मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
2 पवार विश्वासघातकी
3 रेल्वेचा कारभार मनमानी!
Just Now!
X