19 September 2020

News Flash

शस्त्र विक्रीसाठी आलेल्या तरुणास अटक

शहरात अंडरवर्ल्ड आणि गुंड टोळ्यांचा त्रास होऊ न देण्यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून सोमवारी मध्यप्रदेशातून शस्त्र घेऊन आलेल्या एका तरुणास

| March 3, 2015 03:01 am

शहरात अंडरवर्ल्ड आणि गुंड टोळ्यांचा त्रास होऊ न देण्यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून सोमवारी मध्यप्रदेशातून शस्त्र घेऊन आलेल्या एका तरुणास गुन्हे शाखा ९ च्या पथकाने अटक केली आहे.मध्य प्रदेशातील रतलाम येथून एक तरुण शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा ९ च्या पथकाला मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या पथकातील पोलिसांनी सांताक्रुझ येथे सापळा लावून सिराज माजरा (३०) या तरुणास अटक केली. त्याच्याकडून ३ पिस्तुल, आणि ९ राऊंडस मिळाले. गुन्हेगारी टोळ्यांना तो ही शस्त्र विकणार होता. मात्र, त्यापूर्वीच त्याला अटक झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2015 3:01 am

Web Title: youth arrest for selling weapons
Next Stories
1 मुले चोरण्याच्या वेगवेगळ्या घटनांत दोन महिलांना अटक
2 निरुपम यांच्याकडून वाढीव चटईक्षेत्राचे समर्थन
3 अवकाळी पाऊस मदतीबाबत आज चर्चा
Just Now!
X