20 September 2020

News Flash

बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्यास अटक

मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणाऱ्या तरुणास दहशतवाद विरोधी पथकाच्या विक्रोळी विभागाने अटक केली आहे.

| October 13, 2014 01:30 am

मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणाऱ्या तरुणास दहशतवाद विरोधी पथकाच्या विक्रोळी विभागाने अटक केली आहे. नसीम शेख (२१) असे या तरुणाचे नाव असून तो गोवंडी येथे राहणारा आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शनिवारी नसीमने दूरध्वनी करून धमकी दिली होती. मी बिहार येथून बोलत अयूप निवडणूक काळात मुंबईत बॉम्बस्फोट घडवणार असल्याचे सांगितले  निवडणुकीचे वातावरण लक्षात घेता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. दहशतवादविरोधी पथकाने गोंवडी येथून नसीमला अटक केली. तो एका कंपनीत काम करतो. त्याची अधिक चौकशी सुरू आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2014 1:30 am

Web Title: youth arrested for bomb blast threat in mumbai
Next Stories
1 मतदारांना भांडी वाटण्यासाठी निवृत्त पोलिसाचा वापर
2 एफएसआयचा चेंडू केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात
3 पनवेलमध्ये मताचा रेट ५००, १००० रुपये
Just Now!
X