News Flash

अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी तरुणाला अटक

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आकाश (१९) या तरुणाला मालवणी पोलिसांनी अटककेली आहे.

मालवणी येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आकाश (१९) या तरुणाला मालवणी पोलिसांनी अटककेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश हा पिडीत मुलीच्या वडिलांच्या मालकीच्या घरात भाडेकरु म्हणून राहात होता.
मुलीचे वडील ‘चालक’ म्हणून नोकरी करत असल्याने त्यांना प्रसंगी बाहेर जावे लागते तर मुलीची आई परिचारिका म्हणून काम करते. त्या दिवशी मुलीची आई आणि वडील घरी नव्हते हे पाहून आरोपीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.
दरम्यान मुलीचे वडील घरी आलेले पाहून त्याने तिथून पळ काढला होता. या प्रकरणी त्या मुलीच्या वडिलांनी मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आरोपी विशाल हा हैदराबाद येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2016 12:01 am

Web Title: youth arrested for minor girl rape
Next Stories
1 ‘मेक इन इंडिया सप्ताह’मधील आगीच्या घटनेने अमिताभ दु:खी
2 चौपाटीवरील भीषण आगीत तुकोबांची मुर्ती सुखरूप…
3 रिक्षाचालकांच्या संपाने मुंबईकरांचे हाल
Just Now!
X