News Flash

नोकरी गेल्याने बोरिवलीत तरुणाची आत्महत्या

नोकरी गेल्यामुळे निराश झालेल्या एका तरुणाने इमारतीच्या गच्चीवर गळफास लावून आत्महत्या केली. प्रतिक पुरोहित (२७) असे या तरुणाचे नाव आहे. सोमवारी सकाळी बोरीवली ही घटना

| October 14, 2014 02:24 am

नोकरी गेल्यामुळे निराश झालेल्या एका तरुणाने इमारतीच्या गच्चीवर गळफास लावून आत्महत्या केली. प्रतिक पुरोहित (२७) असे या तरुणाचे नाव आहे. सोमवारी सकाळी बोरीवली ही घटना उघडकीस आली. बॅंकेतील नोकरी गेल्याने तो निराश होता.बोरीवली पश्चिमेच्या गांजावाला लेन येथील गांजावाला अपार्टमेंट मध्ये राहणारा प्रतिक एका खाजगी बॅंकेत नोकरी करत होता. काही महिन्यांपूर्वी त्याची नोकरी सुटली. त्याचे लग्नही झाले होते. परंतु नोकरी नसल्याने तो निराश झाला होता. रविवारी रात्री त्याने कुटुंबियांसमवेत जेवण घेतले. सोमवारी सकाळी तो घरातून गायब झाला. त्याचा सर्वत्र शोध सुरु असताना इमारतीच्या गच्चीवरील पाण्याच्या पाइपला गळफास लावलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळला. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. माझ्या मृत्यूस कोणासही जबाबदार धरू नये असे त्याने चिठ्ठीत लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून तो निराश होता. त्यामुळेच त्याने आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला असावा, असे निकटवर्तीयांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2014 2:24 am

Web Title: youth commits suicide after losing job
टॅग : Job
Next Stories
1 डॉ. सुभाष मानेंचे निलंबन रद्द
2 समायोजन न झालेल्या शिक्षकांनाही वेतन मिळणार
3 अंबरनाथमध्ये भीषण आग
Just Now!
X